सावंतपूर ग्राम

सावंतपूर गाव ग्राम दैवत श्री हनुमान यांच्या अशिर्वादाने पुनीत झालेले आहे. सावंतपूर गाव म्हणून नावलौकीकास आलेले आहे. गावात विकास कामाची गंगा वाहिलेली आहे. परंतु पूर्वी गावातील लोकांना अज्ञानपणामुळे व अस्वच्छतेमुळे जलजन्य आजार व साथीचे आजार वांरवार भेडसावत होते. त्यामुळे गावातील लोकांचा बराचसा पैसा वैद्यकीय उपचारासाठी खर्च होत होता. रस्ते करणे गटर बांधणे पिण्याच्या पाण्याची सोय करणे व शासनाच्या विविध योजना राबविणे इ. बाबतीत अग्रेसर असणारे गाव मात्र अरोग्याच्या बाबतीत उदासिन होते. यावर उपाय म्हणजे निर्मलग्राम हे धान्यात घेवून सर्व ज्येष्ठ नेतेमंडळी तरुणमंडळे युवकमंडळे बचतगट युवामंच महिलामंडळे यांना एकत्र करुन आरोग्याच्या दृष्टीने गावाचा कायापालट करणेचे ध्येय उराशी बाळगुन निर्मलग्राम यशस्वी करणेचे दृष्टीने प्रयत्न केले. त्यासाठी प्रथम निर्मलग्राम योजनेचे सुक्ष्म नियोजन तयार करुन गावातील लोकांची मानसिकता तयार केली.