गावाचा इतिहास–
- सावंतपूर गावचे ग्रामदैवत श्री. हनुमान याचे आर्शिवादाने पुनित झालेले आहे. आज सावंतपूर गावात विकास कामाची गंगा वाहत आहे. परंतु पूर्वी गावातील लोकांना अज्ञानपणामुळे व अस्वच्छतेमुळे जलजन्य आजार व साथीचे आजार वारंवार भेडसावत होते तथापी निर्मल ग्राम मुळे स्वच्छतेचे संदेश व्यवस्थीत पाळणेत येतात त्यामुळे सावंतपुर मध्ये स्वच्छतेचे निकष सर्व पार पाडलेले आहेत.